इनरव्हील क्लब भद्रावती येथे ओसीव्हि बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सौ शिला देशमुख मॅडम डिस्ट्रिक्ट चेअरमन यांनी इनरव्हील क्लब भद्रावती च्या सदस्यांना मार्गदर्शन केले.
भद्रावती येथील सुविधा केंद्र येथे इनरव्हील क्लब भद्रावतीची ओसीव्हि बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सौ शिला देशमुख डिस्ट्रिक्ट चेअरमन ह्या प्रमुख मार्गदर्शक उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यांनी इनरव्हील क्लब भद्रावतीचे यावर्षीच्या प्रोजेक्ट फाइल्स जाणून घेतल्या. इनरव्हील क्लब भद्रावती सतत सामाजिक सेवेत अग्रेसर आहे. या बैठकीचे औचित्य साधून इनरव्हील क्लब भद्रावतीने सौ शिला देशमुख डिस्ट्रिक्ट चेअरमन यांच्या हस्ते अपणापन वृद्धाश्रम येथील वृद्धांना थंडीपासून संरक्षण व्हावे यास्तव ब्लॅंकेट चे वाटप केले.
या वेळी सौ शिला देशमुख डिस्ट्रिक्ट चेअरमन यांचा परिचय इनरव्हीलच्या सचिव प्रेमा पोटदुखे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ केशनी हटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ रश्मी बीसेन यांनी केले.
या बैठकीला इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. स्वाती चारी, सचिव प्रेमा पोटदुखे, आयएसओ तृप्ती हिरादेवी, कोषाध्यक्ष वैशाली तेलंग, सी सी सौ रश्मी बीसेन, सौ माला प्रेमचंद , सौ केशनी हटवार, वर्षा धानोरकर, आशा कौशल, मनीषा ढोमणे, शुभांगी बोरकुटे, विश्रांती उराडे , जयश्री कांबडी , विभाग बेहरे, भद्रावती इनरव्हील क्लब च्या सदस्यां उपस्थित होत्या. वृद्धाश्रमाच्या प्रमुख साहिस्ता पठाण व वृद्धाश्रमातील वृद्ध या प्रसंगी उपस्थित होते.






