भद्रावती : येथील लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन नुकताच साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रुपचंद धारणे मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा.किशोर किरमिरे आणि प्रा. नितीन लांजेवार यांनी उपस्थितांना संविधानाचे महत्व पटवून दिले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष वटे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन शिक्षक आर. बी. हातझाडे यांनी केले, तर आभार शिक्षक आर. एस. मामिडवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.






