spot_img
spot_img
25.7 C
New York
Sunday, August 2, 2026

भद्रावतीत शहिद विरांना श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन. मुंबई येथील  २६ / ११ च्या भ्याड हल्ल्यातील शहिद वीर जवान आणि  मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना श्रध्दांजलीपर कार्यक्रम

शिवसेना (उ.बा.ठा. ) माजी सैनिक व विरपत्नी व युवती-युवा सेनेचे आयोजन : विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व

भद्रावती :
      स्थानिक मुख्यमार्गावरील  गौरी ग्रीन्स, श्रीमंगल कार्यालय येथे शिवसेना ( उध्दव बाळासाहेब  ठाकररे ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात  शिवसेना ( उ. बा. ठा. ) माजी सैनिक व विरपत्नी व युवती -युवा सेनेच्या संयुक्त विद्यमाने   दि. २६ नोव्हेंबर रोज रविवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजता  मुंबई येथील  दि.  २६ नोव्हेंबर २००८  च्या भ्याड हल्ल्यातील शहिद वीर जवान आणि  मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना   सामुहिक  श्रध्दांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी श्रध्दांजलीपर देशभक्ती गीते सादर करण्यात येईल.
      यावेळी संविधान दिनानिमित्य संविधान उद्देशिकेचे सामुहिक  वाचन सुध्दा करण्यात येईल . तसेच मान्यवर मंडळीं संविधानाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करतील. सदर उपक्रम राबविण्यासाठी शिवसेना युवा नेते तथा युवा सेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे, शिवसेना व युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई, युवा सेना कार्यकारी सदस्य हर्षल काकडे, शितल देवरुखकर आणि  युवा सेना पूर्व विदर्भ सचिव तथा सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांचे महत्वपूर्ण  मार्गदर्शन लाभले आहे.
कार्यक्रम आयोजनास शिवसेना ( उ. बा. ठा. ) माजी सैनिक सेलचे  कॅ. विलास देठे, विजय तेलरांधे, रामचंद्र नवराते, अजीत राम, प्रमोद गावंडे, नमोद रामटेके,राकेश फुले, दिलीप लेडांगे, रमेश सातेकर , रजनी बावणे, दर्शना तेलरांधे ,द्वारका नवराते आणि इतर माजी सैनिक यांच्यासह  चंद्रपुर जिल्हा महीला सघंटीका नर्मदा बोरेकर, उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने ,वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर , भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, वरोरा शहरप्रमुख खेमराज कुरेकार आणि  भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले  यांच्या सहकार्यात  सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.
      या कार्यक्रमात जनतेनी फार मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
असे संयुक्त आवाहन  युवती सेना जिल्हा अधिकारी प्रतिभा मांडवकर, युवा सेना जिल्हा अधिकारी मनिष जेठानी, युवासेना जिल्हा सरचिटणीस येशु आरगी, युवा सेना उपजिल्हा अधिकारी शरद पुरी, युवतीसेना उपजिल्हा अधिकारी  शिव गुडमल ,वरोरा -भद्रावती विधानसभा युवासेना अधिकारी अभिजीत कुडे, युवासेना चिटणीस   उमेश काकडे,वरोरा तालुका युवासेना अधिकारी विक्की तावाडे , भद्रावती तालुका युवासेना अधिकारी राहुल मालेकर, वरोरा शहर युवा अधिकारी प्रज्वल जानवे आणि भद्रावती शहर अधिकारी मनोज पापडे  यांनी  केले. असे युवासेना प्रसिध्दी प्रमुख गोपाल सातपुते यांनी एक पत्रकातून कळविले आहे.

भारतीय संविधान दिनानिमित्य शिवसेना ( उ. बा. ठा. ) च्या वतीने  शाळा, महाविद्यालय आणि विविध संस्थात आज दि. २५ नोव्हेंबर रोजी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. दि. २६ नोव्हेंबर रोजी सुट्टी असल्याने उर्वरीत ठिकाणी दि. २७ नोव्हेंबर रोजी सदर उपक्रम परत राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!