भद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा येथे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात दि. ३ नोहेंबर २०२३ रोज शुक्रवारला दहा वाजता शेतमाल खरेदीचा शुभारंभ होणार आहे. या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या शुभहस्ते शेतमाल खरेदीचा शुभारंभ करण्यात येईल.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती अश्लेषा भोयर (जिवतोडे) तसेच समस्त संचालक बंधू -भगिनी उपस्थित राहतील. तरी शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल चंदनखेडा उपबाजार येथे विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव नागेश पुनवटकर यांनी केले आहे.






