भद्रावती : स्थानिक श्री संत नगाजी महाराज मंदिर येथे श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी निमित्त दोन दिवस दि. २९ व ३० ऑक्टोबर २०२३ ला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात श्री ची घटस्थापना पुजा व पारायण लक्ष्मणराव चौधरी यांनी केले. महिला व मुलींकरीता विविध स्पर्धा, जागृती, भजन, सामुदायीक ध्यान, गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार, पालखी सोहळा, शोभायात्रा, महिला संमेलन व बाल किर्तनकार ( दुरदर्शन कलाकार) भाविका खंडाळकर यांनी आपल्या सप्त खंजरीच्या आवाजातून समाज प्रबोधन करीत प्रेक्ष्यकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमा करीता लाभलेले प्रमुख अतिथी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. गोपाल घुमे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन शिक्षणाचे महत्त्व समजून दिले व आई वडिलांनी मुलांकरिता किमान दोन तास वेळ देऊन अभ्यास करून घेण्याचा सल्ला दिला. या वेळी मंचावर उपस्थित अनिल धानोरक माजी नगराध्यक्ष भद्रावती, रमेशजी राजूरकर निवडणूक प्रमुख भा.ज.पा. वरोरा भद्रावती विधानसभा, प्रफुल्लभाऊ चटकी माजी उपनगराध्यक्ष, मुकेश जिवतोडे शिवसेना जिल्हा प्रमुख (उबाठा), युवा शिवसैनिक महेश जिवतोडे, सामाजिक कार्यकर्ते संजय राय, सुरज शाहा शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी, माजी नगरसेवक प्रशांत डाखरे होते. कार्यक्रमाला लाभलेले विशेष पाहुणे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी नाभिक समाजला शासकीय योजनांची माहिती देत अनेक थोर महात्म्यांच्या विचार डोक्यावर न घेता डोक्यात घेऊन राजकारण व समाजकारण करण्याचे मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रोशनी शेंडे, प्रास्ताविक उपाध्यक्ष हरीभाऊ घुमे यांनी तर उपस्थितांचे आभार अध्यक्ष बंडु लांडगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता सचिव सचिन नक्षीणे, सहसचिव सुरेश जमदाडे, सुधीर लांडगे, कार्याध्यक्ष रविंद्र हणुमंते, उपाध्यक्ष हरी घुमे, पांडुरंग हनुमंते, कोषाध्यक्ष आशीष चौधरी, सतीश मांडवकर, संघटक सागर घुमे, प्रशांत नक्षिणे, सल्लागार प्रकाश दैवलकर, राजेश येसेकर, महिला अध्यक्ष सूरेखा अतकरे, उपाध्यक्षा प्रतिभा नक्षिणे, कार्याध्यक्ष रागिणी सुत्रपवार, सचिव मोना जांभुळकर, सहसचिव मंजु मेश्राम कोषाध्यक्षा भुवनेश्वरी निंबाळकर, वर्षा वाटेकर, छाया जमदाडे, शोभा लांडगे, नंदिनी लांडगे यांनी सहकार्य केले.






