spot_img
spot_img
24.3 C
New York
Monday, August 3, 2026

संताजी स्नेही मंडळ भद्रावतीच्या नुतन कार्यकारिणीची निवड….

संताजी स्नेही मंडळाच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम नैताम , सचिवपदी सुरेश मस्के विराजमान


संताजी स्नेही मंडळ भद्रावतीची सर्व साधारण आमसभा संताजी सभागृह, संताजी नगर येथे नुकतीच पार पडली. या आमसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये जुन्या कार्यकारीणीचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. यात अध्यक्ष पुरुषोत्तम नैताम, उपाध्यक्ष सतीश पावनकर, प्रशांत झाडे, सचिव सुरेश मस्के, सहसचिव युगेश खोब्रागडे, कोषाध्यक्ष रितेश वाढई, संयोजक रवींद्र शहारे, सहसंयोजक गोपाल गायकवाड, सल्लागार मोहनदास देशमुख, रमेश गाठे, दादाजी चन्ने, तर सदस्य म्हणून सुधीर पारधी, मानोज आष्टनकर, विलास नरड, विनय गुडघाने, महेश बावणे, कुणाल पारधे, अमोल कोटकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .

संताजी महिला मंडळाची नवीन कार्यकारिणी सुद्धा यात जाहीर करण्यात आली. महिला अध्यक्षपदी अनिता आष्टकर ,उपाध्यक्ष जयश्री कांबडी, मंदा तराळे , सचिव निता बावनकुळे,सहसचिव यामिनी नैताम, कोषाध्यक्ष मोहना वैरागडे, सल्लागार श्रद्धा गिरडकर तर सदस्य लक्ष्मी मस्के, रेणुका गायकवाड , अश्विनी झाडे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.


निवड करण्यात आलेल्या पुरुष व महिला कार्यकारिणीचे प्राचार्य डॉ नामदेव ऊमाटे, प्रा. डॉ नासरे, प्रा.डॉ ज्ञानेश हटवार, प्रा.डॉ सुधीर मोते , डॉ नागोसे , प्रा. शेखर जुमडे, प्रा. योगेश नागोसे, प्रा. हरिहर मोहरकर, प्रा.प्रेमा पोटदुखे, प्रा. शेंडे सर , कविश्ववर शेंडे, वरभे सर, विनोद बाळेकळमकर, सुनील पोटदूखे, शुरेश वरघने, विजय मदनकर, शरद भावरकर, विनोद कामडी व समाज बांधवांनी अभिनंदन केले व पुढील संताजी स्नेही मंडळाच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!