spot_img
spot_img
23.1 C
New York
Friday, July 31, 2026

ज्ञानेश्वर सानप यांना आचार्य पदवी

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आचार्य पदवी कक्षाच्या वतीने नुकत्याचं जाहीर झालेल्या परिपत्रकांन्वये ज्ञानेश्वर चंद्रभान सानप यांना आचार्य पदवी प्राप्त झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्री ज्ञानेश्वर सानप यांचा आचार्य पदवी चा विषय ‘मराठी आदिवासी कवयित्रींच्या काव्याचा चिकित्सक अभ्यास’ हा आहे. यांनी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.राजकुमार मुसने यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण केले आहे . आदिवासी कवयित्री उषाकिरण आत्राम , कुसुम अलाम, कविता आत्राम, सीता भोजने , संध्याराणी बांबळे, मुक्ता आंभेरे तथा अन्य कवयित्रीच्या काव्याचा चिकित्सक अभ्यास करून संशोधन प्रबंध विद्यापीठाकडे सादर केला होता. नुकतीच त्यांच्या प्रबंधावर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे मौखिक परीक्षा घेण्यात आली.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले संशोधक ज्ञानेश्वर सानप व त्यांना मार्गदर्शन करणारे डॉक्टर राजकुमार मुसने यांचे माजी प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, डॉ . विद्याधर बन्सोड, डॉ. परमानंद बावनकुळे, डॉ. योगीराज नगराळे, डॉ. राम वासेकर , डॉ. जनबंधू मेश्राम , डॉ. धनराज खानोरकर, डॉ . ज्ञानेश हटवार , डॉ. तुषार चांदवडकर, मा. अशोकराव चव्हाण, नंदकिशोर नैताम आदींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!