कर्जबाजारी पणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
शेगाव बु मधील युवक शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि. २२ ऑक्टोबर ला घडली.
सविस्तर वृत्त या प्रमाणे कि शेगाव बु मधील कोटकर ले आउट मधे राहणारा नितीन उर्फ (गोलू ) रामकृष्ण बावणे वय वर्षे २१ हा युवकाणे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी ५ च्या सुमारास उघडकीस आली. सदर युवक हा घटनेच्या वेळेला घरी एकटाच होता. आई वडील दोघेही शेतात कामाला गेले होते. सायंकाळी तरुणांची आई घरी आली असता सदर युवक हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकाली. ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्याची तुंबड गर्दी झाली होती.
सदर युवक हा आई वडिलांना एकमेव आधार असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या असा एकाकी निर्णयाने आई वडिल यांना असलेला एकुलता एक आधार स्तंभ गेल्याने आई वडिलच आता पोरके झाले आहे.
सदर घटने नंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदणासाठी वरोरा येथे पाठवण्यात आला असून, पुढील तपास ए. पी. आय. अविनाश मेश्राम यांचे मार्गदर्शनात ए. एस. आय. ढोक हे करीत आहे.






