भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती व्दारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे , प्रशिक्षक मुस्कान शेख व्यासपीठावर उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापना संबंधित जनजागृती अभियान व सदस्य नोंदणी करण्याच्या हेतूने यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन कसे करावे, यासंबंधी मुस्कान शेख यांनी प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षणात स्काऊट गाईड, एनएसएस, एनसीसी, हरित सेना व विद्यार्थी उपस्थित होते. टी आर एफ द्वारे आपत्ती व्यवस्थापन कसे करायचे, अडचणीच्या वेळी कशी मदत करायची, बचाव व मदत कार्य कशे करायचे यासंबंधी प्रशिक्षक मुस्कान शेख यांनी अनेक प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक महादेव ताजने सर यांनी केले. सूत्रसंचालन आत्माराम देशमुख यांनी केले. तर आभार प्रदर्शन सतीश नंदनवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ . ज्ञानेश हटवार, किशोर ढोक, कोल्हे, लांबट, पाटील, बनकर, सय्यद मॅडम यांनी सहकार्य केले.






