spot_img
spot_img
28.1 C
New York
Wednesday, August 5, 2026

“विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासाठी ग्रंथालयाचा उपयोग करावा”- प्राचार्य डॉ. वानखेडे

प्रशासकीय सेवा महाविद्यालयात ग्रंथालयाचे उद्घाटन

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित डॉ विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय भद्रावती येथे ग्रंथालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी “विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा वापर आपल्या ज्ञानासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी करावा” असे मार्गदर्शन केले.
डॉक्टर विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय भद्रावतीत ग्रंथालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे उद्घाटक श्री पी.जी. टोंगे, जेष्ठ पत्रकार व समाजसेवक भद्रावती, मार्गदर्शक डॉ. ज्ञानेश हटवार , डॉ. सुधीर मोते, प्राचार्य प्रमोद पाठक व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

महाविद्यालयाचे संचालक व भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे सचिव डॉ कार्तिक शिंदे यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम संपन्न झाला.
उद्घाटक पी. जी. टोंगे सर यांनी मार्गदर्शन करताना ‘विद्यार्थ्यांनी सृष्टीचे निरीक्षण करावे, त्याचा वापर आपल्या अध्ययनात करावा, विद्यार्थ्यांनी चौकस व्हावे’ असे सांगितले .
डॉ. ज्ञानेश हटवार यांनी ” प्रशासकीय सेवा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले लक्ष साध्य करण्यासाठी ग्रंथालयाचा सुयोग्य, पुरेपूर वापर करावा व आपले इप्सित पूर्ण करावे” असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधीर मोते यांनी केले. पाहूण्यांचा परिचय प्राचार्य प्रमोद पाठक यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. निकिता ताडघरे हिने केले, तर आभार प्रदर्शन कु.कोमल ताजणे या विद्यार्थ्यांनी केले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. प्रज्ञा बुरडकर, नेहा मानकर, प्रीती कंदीकट्टीवार, कपिल राऊत यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाला प्राध्यापक , विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!