क्रीडा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय चंद्रपूर यांच्यावतीने आयोजित जिल्हा क्रीडा स्टेडियम येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग क्रीडा प्रकारात यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम खेळाचे कौशल्य दाखविले, त्या मुळे त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे खेळाडू विभागीय स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या विद्यार्थीनींनी १७ वर्षे वयोगटातील बॉक्सिंग क्रीडा प्रकारात जिल्हा स्तरावर यश संपादन केले. शीव कुमार तोडेवार , महेश आडे , महेश खोब्रागडे या तीन खेळाडूंनी या प्रकारात उत्तम क्रीडा कौशल्य दाखवून चंद्रपूर जिल्ह्यात विविध वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर याच विद्यालयाच्या १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये कार्तिक आडे याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला, त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे तो चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
आपल्या क्रीडा कौशल्याचे नैपुण्य दाखवत विविध वजन गटात विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थी खेळाडूंचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ . कार्तिक शिंदे , सहसचिव डॉ. विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे , क्रीडा शिक्षक रमेश चव्हाण, प्राध्यापक डॉ .ज्ञानेश हटवार, माधव केंद्रे , किशोर ढोक, शेखर जुमडे, उमेश पाटील, भद्रावती तालुक्यातील बाक्सिंग कोच लता इंदूरकर व समस्त प्राध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात.
सदर खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे व क्रीडाशिक्षक रमेश चव्हाण व लता इंदूरकर यांना दिले.






