क्रिडा क्षेत्रात मैदान मारले…
क्रीडा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय चंद्रपूर यांच्यावतीने आयोजित जिल्हा क्रीडा स्टेडियम येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा प्रकारात यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम खेळाचे कौशल्य दाखविले, त्या मुळे त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ते खेळाडू विभागीय स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या विद्यार्थीनींनी १७ वर्षे वयोगटातील मैदानी क्रीडा प्रकारात जिल्हा स्तरावर यश संपादन केले. कु. श्रावणी तडस तीन किलोमीटर चालणे या प्रकारात उत्तम क्रीडा कौशल्य दाखवून चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तीची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर याच कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी १९ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये थाळी फेक क्रीडा प्रकारात कु. वैष्णवी मेश्राम हिने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकाविला, व ती विभागीय स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
सतरा वर्षे वयोगटात अब्दुल्ला शेख गोळा फेक या क्रीडा प्रकारात चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. या क्रीडा प्रकारात तो चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व विभागीय स्तरावर करणार आहे.
आपल्या क्रीडा कौशल्याचे नैपुण्य दाखवत विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनी, खेळाडूंचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ . कार्तिक शिंदे , सहसचिव डॉ. विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे , क्रीडा शिक्षक रमेश चव्हाण, प्राध्यापक डॉ .ज्ञानेश हटवार, माधव केंद्रे , किशोर ढोक, शेखर जुमडे व समस्त प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजय विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात.
सदर खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे व क्रीडाशिक्षक रमेश चव्हाण यांना दिले.






