सी डी सी सी भद्रावती चा एटीएम २० दिवसापासून बंद
जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक चंद्रपूर च्या वतीने ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी एटीएम उभारण्यात आलेला आहे. मात्र सीडीसीसी बँक भद्रावती मध्ये लावलेला एटीएम मागील वीस दिवसापासून बंद आहे .
त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . ऑनलाइन सुविधा प्राप्त व्हावी, त्यांना बॅंक मध्ये रांगेत उभे राहण्याचा त्रास होऊ नये, म्हणून एटीएम ची सुविधा पुरविण्यात आलेली आहे. मात्र सीडीसीसी बँक भद्रावती येथे लावलेला एटीएम बऱ्याच दिवसापासून बंद आहे. त्याचा डिस्प्ले गेलेला आहे .
या संदर्भात तेथील मॅनेजरला विचारले असता आम्ही वरती मुख्यालयाला कळवलेले आहे,असे उत्तर दिले. मात्र अजून पर्यंत सीडीसीसी एटीएम भद्रावती हा नादुरुस्त अवस्थेत असून मध्यवर्ती सहकारी जिल्हा बँक प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे . याचा नाहक त्रास बँकेच्या ग्राहकांना सहन करावा लागत आहे. सीडीसीसी बँक भद्रावती चा एटीएम लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.






