भद्रावती येथील विक्रांत राजेश बीसेन यांना जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून सक्सेस गुरु अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.
श्री बीसेन कम्प्यूटर एजुकेशन, मराठी विश्व ज्ञानरंजन वाचनालय , श्री स्कील कम्प्युटर चे संस्थापक / संचालक विक्रांत राजेश बीसेन यांना २०२३ चा सक्सेस गुरु अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
आज पर्यंत विक्रांत राजेश बीसेन यांनी सामाजिक व संगणक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून भद्रावती या नगरीत उत्तुंग भरारी घेतलेली आहे . या वर्षी २५० च्या वर विद्यार्थ्यांना विविध योजनेच्या अंतर्गत निशुल्क व अतिशय अल्पशा दरात प्रशिक्षण देऊन त्यांना आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्यासाठी तयार केले आहे. त्यांनी खेड्यापाड्यातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलं , मुली , पुरुष , महीला व जेष्ठ नागरिकांना सुद्धा संगणक प्रशिक्षण दिले आहे. त्यांचा संगणक क्षेत्राचा दांडगाव अनुभव असल्यामुळे त्यांनी इतरांना प्रशिक्षित केले.
या कार्याची दखल घेत ( ए.आय. सी.पी.इ )ऑल इंडिया कौन्सिल ऑफ प्रोफेशनल एक्सलन्स या संस्थेच्या माध्यमातून ५ ऑक्टोंबर २०२३ ला जागतिक शिक्षक दिनानिमित्त नागपूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना ‘शिक्षक गुरु पुरस्कार’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्तही त्यांना २०२१ चा तसेच २०२२ चा बेस्ट टिचर्सचा अवॉर्ड मीळाला आहे. अनेक संस्थांनी त्यांच्या समाजिक कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे.






