चंद्रपुर : चंद्रपूर नागपूर रस्त्यावर दि.२९ ला राहुल दडमल, अध्यक्ष आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना, महाराष्ट्र तसेच यशवंत वाघ माजी जिल्हा परिषद सदस्य, हरिदास जांभुळे, संजय नन्नावरे, त्रिपणा दडमल यांच्या नेतृत्वात माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजी मोघे यांनी माना जमाती बद्दल केलेल्या असंविधानिक वक्तव्याचा जाहीर निषेध करण्याण्यात आला व शिवाजी मोघेच्या पुतळ्याला चपला जोड्यानी मारून प्रतिमात्मक पुतळ्याचा दहन (जाळून) निषेध करण्यात आला.
निषेध आंदोलनाला अंकित दडमल, दिवाकर मानगूळढे, नत्थू वाघ, सुरेश मानकर,परसराम नन्नावरे, कल्पना घरत, अर्चना नन्नावरे, वनिता जांभुळे, सुनीता श्रीरामे, पौर्णिमा कापरकर, रुपाली दडमल तसेच माना जमातीतील चंद्रपूर शहरातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.






