भद्रावती : परस्परांचा आदर -सन्मान करण्याची महान शिकवण आपल्या संस्कृतीने दिली आहे. समाजात वेळोवेळी परंपरागत उत्सव साजरे करण्यात येतात. या उत्सवातून भारतीय प्राचीन संस्कृतीचे जतन होत असते. असे प्रतिपादन शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी केले.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे व युवा नेते वरुन देसाई यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात युवा सेना युवती यांच्या वतीने वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रात नुकत्याच आयोजित गौरी – गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या निमित्याने शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी विविध गौरी -गणपती सजावटीची पाहणी करतांना उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच सदर मंडळाला भेटवस्तू देण्यात आल्या.

या स्पर्धेला वरोरा आणि भद्रावती तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर स्पर्धा खुल्या गटासाठी घेण्यात आली. या स्पर्धेत माझी वसुंधरा अभियानांतर्गत ईको फ्रेडली सजावटीला प्राधान्य देण्यात आले. स्पर्धा आयोजनात जिल्हा युवती अधिकारी प्रतिभा मांडवकर, उपशहर समन्वयक स्नेहा किन्नाके, उप तालुका अधिकारी पूनम सरपाते, तालुका चिटणीस साक्षी वैद्य, उप तालुका युवती अधिकारी स्नेहा मांडवकर आणि पायल खुळसंगे आणि विधानसभा संघटक साक्षी ठेंगणे यांनी सदर स्पर्धेचे नियोजन केले.

या स्पर्धेतील विजेत्या व सहभागी स्पर्धकांना शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे आणि जिल्हा संघटिका नर्मदा दत्ता बोरेकर यांच्या शुभहस्ते लवकरच बक्षीस वितरीत करण्यात येईल. विजेत्या स्पर्धकात शुभांगी देवतळे, सतिश गिरसावळे, पवन महाडीक, माया विलायतकर, यशवंत गायकवाड, सुनिता टोंगे, विजया धोटे, स्मिता धोपटे, उल्लास लोखंडे, हर्षय गायधने, माधुरी बोधे, विठ्ठल कहुरके, मनिषा बोधे, पल्लवी मोघे, कृष्णा बोरेकर, बाळकृष्ण हिवरकर, रमेश वाटेकर, मुकेश काकडे, दौलत ठेंगणे,राजराम वांढरे यांच्यासह इतर स्पर्धकांचा सहभाग आहे.






