भद्रावती : नुकत्याच वर्धा येथे जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या विभागस्तरिय शालेय क्रीडा स्पर्धेत येथील लोकमान्य विद्यालयाचा १७ वर्षांखालील मुलांचा व्हाॅलीबाॅल संघ विजयी ठरला असून तो आता पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरिय व्हाॅलीबाॅल स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
वर्धा येथे पार पडलेल्या विभाग स्तरिय व्हाॅलीबाॅल स्पर्धेत लोकमान्य विद्यालयाच्या संघाने चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यात नागपूर ग्रामीण आणि वर्धा जिल्हा या संघांना पराभूत करीत अंतिम सामन्यात नागपूर महानगरपालिका या बलाढ्य संघाला जोरदार टक्कर देत तिसऱ्या सेटमध्ये दणदणीत विजय मिळवून राज्यस्तरिय स्पर्धेकरिता आपले स्थान पक्के केले. विजेत्या व्हाॅलीबाॅल संघात साहील पिंपळकर, अथर्व रणदिवे, सृजल जट्टलवार, सोहम खिरटकर, कुणाल गाडगे, हर्षल डाहुले, यश पिंपळकर, यश नारळे, निशांत नगराळे, मोहीत मारोटकर, यश पाटील, हिमांशू सैताने इत्यादी खेळाडूंचा समावेश आहे.

विजयी खेळाडूंचे लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, सचिव नामदेवराव कोल्हे, सहसचिव अमित गुंडावार, शाळा समितीचे अध्यक्ष उल्हास भास्करवार, लोकसेवा मंडळाचे सदस्य गोपाळराव ठेंगणे, प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रुपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे, क्रीडा विभाग प्रमुख विशाल गावंडे, रवींद्र नंदनवार, शरद राजुरकर, अभिजित काशीवार, देविदास जांभुळे, प्रतीक्षा खुजे, प्रिया भास्करवार आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदाने अभिनंदन केले आहे. हे सर्व खेळाडू आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक राजेश मत्ते, प्रफुल्ल चटकी, समीर बलकी, आनंद येंगुर्थवार, आदर्श आसुटकर, योगेश ढोके, दिनेश ब्रम्हे, शिवा पांढरे, नवोदय स्पोर्टींग क्लब व विवेकानंद स्पोर्टींग क्लब यांना देतात.






