spot_img
spot_img
23.5 C
New York
Monday, August 3, 2026

चिकाटी व परिश्रमातून अधिकारी होता येते….डॉ.काठोळे

मी आय ए एस अधिकारी होणार हा कार्यक्रम डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय भद्रावती येथे संपन्न

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित डॉ.विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय भद्रावती येथे मी आय ए एस अधिकारी होणार या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 25 सप्टेंबर 2023 सोमवारी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉक्टर विवेक शिंदे संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे प्राचार्य डॉ. जयंत वानखडे प्राचार्य प्रमोद पाठक यासोबत कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक डॉ. नरेशचंद्र काठोळे, डॉ. दिलीप झलके सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस कमिशनर नागपूर प्रमुख अतिथी, श्री रवींद्र तीराणिक श्रीकांत देवळे प्रमोद रामेकर प्राध्यापक घाटे उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत प्रा. डॉ.प्रशांत पाठक, प्रज्ञा लांडे, नेहा मानकर, प्रा.डॉ. सुधीर मोते प्रा. किशोर ढोक प्रीती मॅडम सीमा हवेलिकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉ. प्रशांत पाठक यांनी सांभाळले तर प्रास्ताविक डॉ. जयंत वानखडे यांनी केले. कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचा परिचय रवींद्र तिरानिक यांनी करून दिला.या कार्यक्रमाला लाभलेले माननीय डॉ. दिलीप झलके यांनी आपल्या अनुभवातून स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी सिव्हिल सर्विस मध्ये व्यक्तित जिज्ञासा असणे गरजेचे आहे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून आलेले डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह जिज्ञासा आणि अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन केले. प्राध्यापक घाटे यांनी विद्यार्थ्यांना कवितेचे संबोधन केले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अध्यक्ष डॉ. कार्तिक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात उत्साह आणि वेळेचे बंधन कसे महत्वाचे आहे यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक कपिल राऊत यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी या सर्वांचे स्वागत प्रा. डॉ.प्रशांत पाठक, प्रज्ञा लांडे, नेहा मानकर, प्रा.डॉ. सुधीर मोते प्रा. किशोर ढोक प्रीती मॅडम सीमा हवेलिकर यांनी केले. प्रा. रमेश चव्हाण प्रा. गुंडावार प्राध्यापक मांदळे प्रा. पोटदुखे प्रा. वानखडे मॅडम प्रा. हटवार प्रा.झकुलावर इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!