उज्वला नागोसे यांनी गोडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल संताजी स्नेही मंडळ भद्रावती तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
भद्रावती येथील उज्वला नागोसे यांनी अर्थशास्त्र या विषयावर “डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे कृषी विषयक विचार व कार्य याचा चिकित्सक अभ्यास” या विषयावर गोडवाना विद्यापीठ गडचिरोलीची आचार्य पदवी प्राप्त केली. संसाराचा व्याप सांभाळून आपले अध्ययन व संशोधन कार्य पूर्ण करून आचार्य पदवी मिळविल्याबद्दल संताजी स्नेही मंडळ भद्रावतीचे पदाधिकारी श्री. बंडुजी शेंडे सर यांच्या हस्ते उज्वला नागोसे हिचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संताजी स्नेही मंडळ भद्रावतीचे पदाधिकारी डॉ. सुधीर मोते, डॉ. ज्ञानेश हटवार, दीपक नीकुरे, योगेश नागोसे , युवराज तराळे, सुधाकर ठाकरे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.






