spot_img
spot_img
6.6 C
New York
Saturday, November 28, 2026

वृद्धाश्रमात साजरा केला वाढदिवस

आपला वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करण्याची अनोखी कल्पना देवांश अनंत ठाकरे यानी अमलात आणली. त्यांनी आपला वाढदिवस डेबू सावली वृद्धाश्रम चंद्रपूर येथे साजरा करून वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत आपला आनंद द्विगुणित केला.

आपला वाढदिवस एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये, एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जाऊन साजरा केला जावा, ही प्रत्येकाची मनीषा असते. मात्र या सगळ्या कल्पनेला बाजूला सारून आपला वाढदिवस हा वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत साजरा केला जावा , असा हा आग्रह देवांश अनंत ठाकरे यांनी एक दिवसाआधी आपल्या आई वडिलांना सांगून एक आश्चर्याचा धक्का दिला.

देवांश ठाकरे हा दहाव्या वर्गात शिकणारा विद्यार्थी असून नारायणा स्कूल चंद्रपूर येथे शिक्षण घेत आहे. आपला वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करण्याची अनोखी कल्पना त्याच्या मनात आली आणि त्यांनी आपल्या मित्रमंडळींसोबत आपला वाढदिवस डेबू सावली वृद्धाश्रम चंद्रपूर येथे जाऊन साजरा केला. या वयात अशी कल्पना सुचली हे मात्र नाविन्यपूर्ण आहे. आपला वाढदिवस डेबू सावली वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत साजरा केल्यामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच आनंदाची झलक दिसत होती. या आश्रमात तीस वृद्ध सध्या वास्तव्यास आहेत. यामुळे त्यांना आपल्या परिवारातील व्यक्तिसोबत आपण असल्याचा अनुभव आला. यावेळी एका वृद्ध गृहस्थाने सुंदर असे गीत गायन केले व उपस्थित त्यांचे मनोरंजन केले. तसेच एका वृद्ध महिलेने सुंदर कविता सादर करून उपस्थितांचा आभार व्यक्त केले.

यावेळी देवांश अनंत ठाकरे त्याचे आई बाबा,सोबत काही नातेवाईक, डॉ ज्ञानेश हटवार, देवांशी मित्रमंडळी उपस्थित होते. त्यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत सह भोजनाचा आनंद घेतला. यावेळी देवांशला विचारले असता मी माझा वाढदिवस वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत साजरा केल्यामुळे एका वेगळ्या परिवारात आल्याचा आनंद मिळाला, मी त्यांना अल्पसा आनंद देऊन शकलो. मला माझ्या आजी आजोबांची आठवण झाल्याचे व्यक्त केले. यावेळी देवांश व मित्रांनी वृध्दाश्रमातील वृद्धांसोबत चर्चा करून त्यांची विचारपूस केली, या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष, सचिव हे सुध्दा उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!