spot_img
spot_img
24.1 C
New York
Monday, August 3, 2026

ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण…


अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोजरी द्वारे घेण्यात येणाऱ्या ग्रामगीता जीवन विकास परीक्षेसाठी यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
ग्रामगीता जीवन विकास परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सचिव प्रा. डाॅ. कार्तिक शिंदे व प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
राष्ट्रसंतांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा व मुलांवर संस्कार मूल्य रुजावे, विद्यार्थी सुसंस्कारित व्हावा या हेतूने ही परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेत भद्रावती येथील यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील ७५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्वच विद्यार्थ्यांनी ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. ही परीक्षा आयोजित करण्यासाठी प्रा. डाॅ. ज्ञानेश हटवार यांनी जबाबदारी पार पाडली.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्राध्यापक किशोर ढोक , डॉ. प्रशांत पाठक , सुहास कोल्हे यांनी सहकार्य केले. या प्रसंगी शिक्षक, प्राध्यापक , विद्यार्थी , विद्यार्थिनी उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!