भद्रावती : नुकत्याच चंद्रपूर येथे जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या जिल्हा स्तरिय शालेय क्रीडा स्पर्धेत येथील लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूने बाजी मारली असून तो आता विभाग स्तरावर खेळणार आहे.

वेट लिफ्टींग स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात मंथन गेडाम या खेळाडूने जिल्हा स्तरावर विजेते पद मिळविले. यानंतर तो विभाग स्तरावर चंद्रपूर जिल्ह्यचे नेतृत्व करणार आहे. या विजयी खेळाडूचे लोकमान्य कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रुपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे, क्रीडा विभाग प्रमुख विशाल गावंडे, प्रा.स्वाती गुंडावार आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदाने अभिनंदन केले असून विभागीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.
मंथन ने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक अमोल आवळे, मार्गदर्शक प्रा. पवन गौरकार, प्रा. किशोर किरमिरे, प्रा. नितीन लांजेवार, प्रा.विजय गायकवाड आणि रवी नंदनवार यांना दिले आहे.






