वरोरा : शेगाव वरून चंदनखेडा मार्गे मोहर्ली जाणारा रस्ता म्हणजे ताडोबा जाणारा पर्यटकांच्या पसंतीचा रस्ता आहे. नागपूर कडून येणाऱ्या व मोहर्ली गेट, खुटावंडा गेट, आगरझरी गेट जाण्यासाठी कमी अंतराचा व सरळ रस्ता म्हणून या रस्त्याकडे पर्यटकांचा नेहमीच कल असतो. परंतु मागील काही महिन्यापासून या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ठिक ठिकाणी हा रस्त्यावर खड्डे पडले असून काही ठिकाणी जीवघेणे खड्डे पडलेले आहे. मात्र बांधकाम विभागाचे या कडे दुर्लक्ष दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजावण्यात यावे अशी मागणी प्रवास्यांकडून होत आहे.






