चंद्रपूर : गगन मलिक फाऊंडेशन व्दारा थायलंड आणि व्हिएतनाम प्राप्त ५५५ बुद्ध मुर्ति वाटप व गौरव कार्यक्रम तथा पर देशातील शिक्षणाकरीता शिष्यवृत्तिच्या संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम दिनांक ०२ सप्टॆंबर शनिवारला दुपारी ३ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गाँधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपुर येथे होणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्य अतिथी मणित उडोमकुन्नौम चेयरमैन ऑफ होम प्रोडक्ट सेंटर पब्लिक को लैड एण्ड रारे बेवर्गे को लैड राहणार आहे. ते व्यवसाय या विषयावर मार्गदर्शक करणार आहे. तसेच मार्गदर्शक म्हणुन हेमंत सुटे राहतील. परदेशातील शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या संधी देऊन १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना परदेशात पाठविले. त्यांनी ३५ वर्षा पासुन महाराष्ट्रामध्ये सर्व जातीय विद्यार्थ्यांना विदेशामध्ये भारतातल्या ५० टॉप युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश दिले, १००% शिष्यवृत्ती प्राप्त करून दिली. मागील वर्षी चंद्रपुर मधल्या ६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त करून दिली. ते परदेशातील शिष्यवृत्ती संधी या विषयावर मार्गदर्शक करणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष गगन मलिक फाऊंडेशन धम्म दूत डॉ. गगन मलिक हे बुद्ध धम्म विषयावर मार्गदर्शक करणार आहे.कार्यक्रमाला धम्म दूत नात्ताकित छाईचैलरम्मोंगखों डायरेक्टर ऑफ़ त्रिरत्तनभूमी सोसायटी, थाईलैंड, प्रमुख पाहुणे कोमक्रिच जुटाकनों प्रेसिडेंट एंड फाउंडर वेरिट्रांस इंटरनेशनल को एटीड एण्ड आओमठाई फाउंडेशन, थाईलैंड, मनिष जैन डायरेक्टर ऑफ एंपोरोस लिंक्स पीसीटी एलटीडी अहमदाबाद ( गुजरात), सिद्धांत शंघरी डायरेक्टर ऑफ़ त्रिपुरा ओड पीवीडी, दुबई साइनर्गीअ बिज़नेस वेंचर्स, डॉ. श्रीनिवास गोमसे सोशल वर्कर (हैदराबाद), महाउपासक डॉ. सिद्धार्थ हत्तिअंबीरे आदी उपस्थितीत राहणार आहे. कार्यक्रम आयोजक विनय बोधी डोंगरे, अमित वाघमारे, विकास तायडे, बाळुभाऊ रामटेके, प्रणित तोडे, गगन मलिक फाऊंडेशन टीम यांनी कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांनी उपस्थितीत राहावे असे आवाहन केले आहे.






