मेजर ध्यानचंद यांची जयंती उत्साहात साजरी
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती व्दारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हाॅकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. कार्तिक शिंदे यांनी , “जीवनात खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे , आपण खेळात सातत्य ठेवले पाहिजे” असे सांगितले.
यशवंतराव शिंदे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे स्व. निळकंठराव शिंदे क्रीडांगणात मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाला अध्यक्ष प्रा. डॉ. कार्तिक शिंदे सचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. विशाल शिंदे सहसचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, किसन पत्तिवार कबड्डी पटू , प्रा. डॉ. सुधीर मोते हे व्यासपीठावर उपस्थित होते.
खेळाडूंना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. विशाल शिंदे यांनी “खेळातून व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते, तसेच खेळातून आपले करिअर घडविता येते” असे मौलिक उद्बोधन केले. प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक रमेश चव्हाण यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक किशोर ढोक यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक माधव केंद्रे यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक डॉ.ज्ञानेश हटवार, कमलाकर हवाईकर, प्राध्यापक, शिक्षक , खेळाडू, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.






