२३ जुलै रविवार ला “सत्कार गुणवंतांचा” हा प्रोत्साहनत्मक कार्यक्रम लक्ष्मी लाॅन शेगाव बु येथे संपन्न झाला. शेगाव बु तसेच मधील इयत्ता ४ था, १० वा १२ वा तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विठ्यार्थ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन इतर विध्यार्थ्यानी सुद्धा त्यांच्यास सारखे जोमाने अभ्यास करुन आपले नाव उज्ज्वल करावे व जोमाने अभ्यास करावा या साठी १० वि, १२ वि, मध्ये सर्वात जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विज्ञानर्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते प्रकाश महाकाळकर गट शिक्षणअधिकारी पंचायत समिती भद्रावती हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक धनराज आस्वले सेवानिवृत्त प्राध्यापक भद्रावती, प्रमुख उपस्थिती प्रकाश पदमावर, डॉ. खोब्रागडे, प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष विनोद चिकटे, बालाजी ढाकूणकर नेहरू विद्यालय प्राचार्य यांच्या हस्ते. प्रथम आलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी वर्ग चौथा आरव गजानन शेंडे, राधा रामकृष्ण घोडमारे, वर्ग दहावा रोहित भगवान प्रसाद शर्मा, प्राजक्ता नंदकिशोर कोकुडे, वर्ग बारावी करिन मुकेश वरवाडे, अयान अल्ताक शेख, यांचा सत्कार करण्यात आला तसेच विशेष सत्कारमूर्ती यशस्वी युवा युद्योजक वैभव अविनाशजी पद्मावार, व तनुजा गोपाळदास खोब्रागडे,(पी. एस. आय.) गिरोला, कल्याणी दत्तूजी शिंगरु एम एम.सी. बाॅटनी विषयात गोंडवाना विद्यापीठात प्रथम या सर्व विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रबोधन मंडळाचे सचिव भालचंद्र लोडे यांनी केले, व आभार प्रदर्शन डॉ प्रमोद बोंदगुलवार यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले पाहुणे मंडळी व विद्यार्थी व पालक वर्गांचे आभार प्रबोधन मंडळाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग, गावातील प्रतिष्ठित नागरिक व प्रबोधन मंडळाचे सदस्य गण मानकर, शिरभैय्ये, देवरावजी साखरकर, सुधीर चिकटे, भारत नरड, चंदु जयस्वाल, मनोज बोंदगुलवार, रुपेश फुटाणे, चंदुजी वाटकर, निलेश लोडे, ईश्वर नरड, राकेश कोटकर, वसंत निखाडे सर्व सदस्य उपस्थित होते.






