spot_img
spot_img
28.3 C
New York
Saturday, August 1, 2026

गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने हरीश शर्मा यांचा सत्कार

भद्रावती : ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदीर पंढरपूरच्या उत्सव समितीचे अध्यक्ष तथा भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा महामंत्री डॉ. अंकुश आगलावे यांच्या हस्ते हरिश शर्मा यांचा नुकताच मजरा गेस्ट हाऊस येथे नुकताच सत्कार करण्यात आला. चंद्रपूर जिल्हयाचे भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून हरिश शर्मा यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे डॉ. आगलावे यांनी मोझरी येथून आणलेली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रतिमा व पंढरपूर येथून आणलेली विठ्ठल रूख्माईची मूर्ती, ग्रामगीता व भगवी टोपी देवून हरिश शर्मा यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. आगलावे म्हणाले की, चंद्रपूर जिल्हयातील विशेष करून ग्रामीण भागाला त्यांच्या नियुक्तीने बळ मिळेल, आम्ही राजकारण करीत नसून समाजसेवा करीत आहोत असेही आगलावे यावेळी म्हणाले. बल्लारपुर शहर सुंदर केल्याचे कार्य तुमच्या हातुन घडले असे यावेळी बोलले. तसेच डॉ. भगवान गायकवाड यांनी सुध्दा मार्गदर्शन केले. याप्रसंगी हरिश शर्मा म्हणाले की, डॉ. आगलावे हे सामाजिक क्षेत्रात मोठया पोटतिडकिने कार्य करीत असून वंचित शोषितांना मदत करीत असतात. समाजात कोणता भेदभाव न बाळगता निःस्वार्थपणे समाजाची सेवा करीत असतात. यावेळी भाजपाचे डॉ. भगवान गायकवाड, बाबा भागाडे, अेहतेशाली अली, सुरेश महाजन, ओम मांडकवकर, राजु गायकवाड, नरेंद्र जीवतोडे, हनसन राव, विनय राव , अफजलभाई, मधुसूदन टिपले, सुनिता काकडे, देविदास ताजने, उपसरपंच निळकंठ वरभे, सरपंच सुनिल खामनकर, माजी सरपंच देवेंद्र वांढरे, शेंबळ सरपंच बालाजी जीवतोडे, सतीश विरूटकर, मंगेश म्हारतडे, प्रफुल ताजने, संतोष काळे, राजु तिखट, स्वप्निल ताकसांडे, हितेश मेश्राम, सुरेश देहारकर, राकेष बोढे, सदस्य आनंद ढोके, सरीखा धाबेकर, उपसरपंच वांढरे, सुनिल कंडे, ज्योती विकास वाकडे, विकास वाकडे, निंबाळकर ताई, वाकडे गुरूजी, गुडडू एकरे, पांढूरंग आगलावे, अमोल मेश्राम, यावेळी छत्रपती सेनेचे गजानन पिंपळकर, योगेश वाळके, गुरूदेव सेवा मंडळाचे प्रचारक व केंद्रीय मानवाधिकार संगठनचे सदस्य उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!