महाराष्ट्र : पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने काल मुंबई येथिल विधानभवनात विधानसभेचे उपाध्यक्ष ना नरहरी झिरवाळ यांच्या दालनात पुरोगामी पत्रकार संघाचे विविध मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याच प्रमाणे ना नरहरी झिरवाळ यांच्या पुढाकाराने दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात ना नरहरी झिरवाळ, अजितदादा पवार व पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी यांची बैठक झाली त्या बैठकीत अजितदादा पवार यांनी पुरोगामी पत्रकार संघाचे समस्या व मागण्या जाणून घेतल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालय संबधीत विषयी असलेल्या मागण्या मान्य करत जागेवरच संबधीत सचिव यांना पाचारण करून मागण्या मान्य केल्या. केंद्र शासनाच्या निगडीत विषयावर केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले.

या बैठकीला पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अंडागळे, राज्य अध्यक्ष संतोष जाधव, अन्याय अत्याचार निवारण समिती च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कल्याणी धोंडगे, राज्य महिला कार्याध्यक्ष मनिषा पवार, राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब अस्वले, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय कानडे, नासिक जिल्हा अध्यक्ष रफिक सैयद, जिल्हा संपर्क प्रमुख सुकदेव खुर्दळ, मालेगाव तालुका अध्यक्ष शेखर सोनवणे, पोलीस मित्र समिती चे तालुका उपाध्यक्ष मधूकर भोये आदि उपस्थित होते






