रोटरी क्लब भद्रावती द्वारे भद्रावती येथे हुतात्मा स्मार मध्ये आयोजित एकुप्रेशन सुजोक व्हायब्रेशन नॅचरल थेरिफिकेशन शिबिर आज दिनांक 20 जुलै 2023 रोजी संपन्न झाले या शिबिराला 200 च्या वर शिबिरार्थींनी लाभ घेतला या शिबिराचे आयोजन 14 जुलै 2023 रोजी सुरू करण्यात आले होते या शिबिर रात ज्या ज्या शिबिरार्थींनी रजिस्ट्रेशन केले प्रत्येक शिबिरार्थीस 14 तारखेपासून 19 तारखेपर्यंत सतत सहा दिवस दररोज मोफत उपचार करण्यात आला या शिबिरात राजास्थानहून आलेले स्पेशालिस्ट चौधरी जी आणि गुरुपीठ सिंग यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन करून शिबिरार्थींना व्हायब्रेशन नॅचरल थेरिफिकेशन याच्याविषयी संपूर्ण माहिती व त्याचा वापर उपयोग भविष्यात घरी कसा करायचा व त्यासाठी कोणत्या प्रकारची व्यायाम थेरेपी घरी बसल्याबसल्या करायची याची माहिती 19 तारखेला दोन विभागात सगळ्यांसमोर प्रात्यक्षिक करून दाखविले व दैनंदिन जीवनात शरीराला कशा प्रकारची आवश्यकता असते व त्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या शारीरिक शारीरिक व्यायाम केल्याने व वेगवेगळ्या थेरपी केल्याने आपल्या शरीरातील रोग कसे बरे होऊ शकतात याची माहिती दिली त्यावेळेस रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री अनिल भाऊ धानोरकर सचिव सुधीर भाऊ पारधी कोषाध्यक्ष विक्रांत बीसेन यांच्या हस्ते सन्माननीय अधिकाऱ्यांचे सन्मान करून त्यांना समोरच्या शिबिरांसाठी अभिनंदन पर शुभेच्छा देण्यात आल्या. शिबिरासाठी सर्व रोटरीयांसनी महत्वपूर्ण आपापल्या वेळेचा लाभ देऊन या शिबिराला यशस्वी केले त्यासाठी रोटरीयन्स प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर माला प्रेमचंद यांनी धन्यवाद दिले व असेच कार्यक्रम भद्रावती शहरांमध्ये लोकहितासाठी करण्यात येईल व समोरही रोटरी क्लब भद्रावती मार्फत आरोग्य नाही तर भद्रावतीतील जनते साठी वेगवेगळ्या शिबीराचे आयोजन करू असे रोटरी क्लबच्या सगळ्या सदस्यांनी आश्वासन दिले.
यावेळेस रोटेरियन कोषाध्यक्ष विक्रांत राजेश बीसेन यांनी सगळ्या शिबिरातील शिबिरास भेट देणाऱ्या जनतेचे व रोटेरियन रोटरी क्लब भद्रावतीच्या सगळ्या सदस्यांचे आभार मानले






