राष्ट्रपतीच्या उपस्थितीत सत्कार होणारी ठरली गावातील पहिली व्यक्ती
शेगाव :- काही दिवसा आधीच लागलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षेत एम. एस. सी. बॉटणी विभागातून शेगाव बु. मधील शेतकरी कुटुंबातील कल्याणी दत्तात्रय शिगरू ह्या विद्यार्थिनीने बॉटणी विभागामधून संपूर्ण विद्यापीठातून अव्वल येत कॉलेज सोबतच संपूर्ण शेगाव वासियासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
दि. ०५ जुलै ला झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या १० व्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, तसेच वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठाच्या कुलपती डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते सुवर्ण पदक व गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन कल्याणीचा सत्कार करण्यात आला.






