वरोरा:-तालुक्यातील उखर्डा येथील शेतकरी रमेश कुडे यांच्या शेतात वीज पडून २ बैल जागीच ठार झाले. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. अशातच खुरपणी करिता शेतकऱ्याला बैलाची मदत घ्यावी लागते व यावेळी बैल नसेल तर शेतकर्यांना अनेक समस्याचा सामना करावा लागतो, त्यात अकस्मात आलेल्या अस्मानी संकटामुळे दि. ४ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता वीज पडून बैल मरण पावलेअसून त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. घटनेची माहिती मिळताच पटवारी मेश्राम यांनी मौका पंचनामा करुन अहवाल पाठवलेला आहे.
ऐन शेतीच्या हंगामात दीड लाखाची जोडी गेल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मदत तोकड्या स्वरुपात मिळत असून खूप वेळ लागतो. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला बैल खरेदी करण्याकरिता लवकरात लवकर भरीव आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी अभिजित कुडे यांनी केली आहे.






