spot_img
spot_img
26.6 C
New York
Saturday, August 1, 2026

समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात, २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

नागपूरहून पुण्याला जात असलेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी बसचा अपघात

बुलढाणा : बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाला झोप लागल्याने बस थेट डिव्हायरला धडकली. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. सिंदखेडराजा परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. बसमधील जखमींना तातडीने उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून ३३ प्रवाशी प्रवास करीत होते. बुलढाण्याजवळीच सिंदखेडराजा परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायरला धडकली आणि रस्त्यावरच उलटली. हा अपघात इतका भीषण होता की, क्षणार्धात बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!