spot_img
spot_img
27.8 C
New York
Friday, July 31, 2026

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भद्रावतीत तीव्र निषेध

हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कडक शासन करा - भीम आर्मी भद्रावती

भद्रावती : सहारानपुर येथे मनुवादी विचारसरणीच्या काही अज्ञात हल्लेखोरांनी आजाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीम आर्मी चे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर पूर्वनियोजित भ्याड हल्ला केला असून, देशातील शांततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर जनक बाब आहे. यापूर्वी अनेक वेळा भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी सहारानपुरचे जिल्हा पोलीस अधीक्षक व डिजीपी पोलीस प्रशासन लखनऊ व तेथील मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सुरक्षित संदर्भात जीविताला धोका असल्याची सदर बाब संबंधित शासनाच्या निर्देशनात आणून दिली होती. परंतु त्यांच्या सुरक्षितते संदर्भात तेथील प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही. प्रशासनाच्या नाकारत्या व अलगर्जीपणामुळे या आधी देखील अनेक विघातक घटना मोठ्या प्रमाणात घडत आल्या आहेत व त्यानंतर बहुजन समाज पक्षाचे लोकप्रिय नेते यांच्यावर दिनांक २८ जून २०२३ ला झालेला भ्याड हल्ला ही अत्यंत गंभीर बाब असून लोकशाही प्रधान भारत देशात विचार करण्यासारखी आहे. सदर प्रकरणासंदर्भात प्रशासनाने गांभीर्याने घेऊन, हल्लेखोरांना तातडीने शोधून तात्काळ अटक करावी व कठोर कारवाई करावी. भीम आर्मी चे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी. सदर खटला जलद गतीने न्यायालयात चालवून सर्व दोषींवर कडक शिक्षा व्हावी.

यासाठी भीम आर्मी शिष्टमंडळाद्वारे महाराष्ट्र महासचिव भाई शंकर मून, युवा सामाजिक कार्यकर्ते रतन पेटकर, तालुकाप्रमुख मिलिंद शेंडे, उप तालुका प्रमुख अन्वर शेख, तालुका संघटक निशांत मेश्राम, पिंटू मेश्राम, तालुका महासचिव अनिकेत रायपुरे, राजूभाऊ मेश्राम, अमोल चालखुरे, सुरज भेले, शहर संघटक अतुल पाटील, थामास दुधे, स्वप्निल बनकर, चंदन वाडेकर आदी इतर अनेक कार्यकर्त्यांनी शिष्टमंडळासहित निवेदन सादर केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!