चालक जखमी झाल्याने उचरासाठी रवाना
खांबाडा:- वनी येथून खत लोड करून नागपूर च्या दिशेने निघालेला ट्रक क्र. पि. बी. ०३ ए. पी. ९९६२ हा ट्रक चालकाचे खांबाडा येथे ब्रेकरवर नियंत्रण सुटल्याने खत घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. त्यामुळे नागपूर जाणारी वाहतूक विसकळीत झाली असून नागपूर कडे जाणारा रोड वर खताच्या ब्याग पसरल्यामुळे एकतर्फी वाहतूक बंद पडली आहे, त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक एकच बाजूनी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ट्रक चालक जखमी झाला असून वरोरा पोलीस व स्थानिक लोकांच्या साहाय्याने रस्ता सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. खांबडा येथील दुभाजकजवडील गतिरोधक हे वाहन चालकास दिसत नसल्यामुळे येथे नेहमी अपघाताचे सत्र चालूच असते. त्यामुळे या गतिरोधकाला रंग रांगोटी करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करित आहे






