गोंडपिपरी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, सचिव नितीन काकडे यांच्या मार्गदर्शनात आणि चंद्रपूर जिल्हा संघटन मंत्री वसंत वऱ्हाटे, जिल्हा अध्यक्षा नंदिनी चुनारकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रविण चिमुरकर, जिल्हा कोषाध्यक्ष आण्याजी ढवस यांच्या उपस्थितीत दिनाक १८ जुन ला गोंडपिपरी येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या शाखेची स्थापना करण्यात आली.
गोंडपिपरी ग्राहक पंचायतचे अध्यक्ष म्हणून डॉ. सोमेश्वर झुरे, उपाध्यक्ष संतोष आस्वले, सचिव पत्रु बक्षे, सहसचिव योगेश्वर गुडपल्ले, कोषाध्यक्ष देवाजी पुलगमकर, संघटन मंत्री शंकर पाल, प्रशीद्धी प्रमुख अरूण वासलवार, कायदेविषयक सल्लागार ॲड. प्रफुल आस्वले, कार्यकारिणी सदस्य आनंद खर्डीवार, राजेश्वर बट्टे आणि विठोबा शेरकी यांची निवड करण्यात आली.
ग्राहक पंचायत गोंडपिपरी तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपली ग्राहक म्हणून कोणतीही फसवणूक झाल्यास किंवा ग्राहकांच्या हक्काचे खंडण केले असल्यास ग्राहक पंचायत गोंडपिपरी ला संपर्क करावा.






