भद्रावती : सुमठाणा परिसरातील चंद्रपूर-नागपुर हायवे लगत असणाऱ्या प्रभा कॉम्प्लेक्स मध्ये जिन्याखाली असलेल्या दुचाकी ला अचानक आग लागली. अचानक धुर निघत असल्यामुळे प्रमोद खोब्रागडे यांनी पाहीले असता त्यांना जिन्याखाली असलेली दुचाकीला आग लागलेली दिसली. त्यात एक टिव्हीएस अपाचे कंपनीची दुचाकी जळुन खाक झाली.

प्रमोद खोब्रागडे हे उमेश अलोने यांच्या प्रभा कॉम्प्लेक्स मध्ये किरायाणे राहतात. त्यांची एक दुचाकी जळुन खाक झाली तर दुसरी दुचाकी ला त्यांनी वेळेवर बाजुला केले त्यामुळे दुसरी दुचाकीचे नुकसान झाले नाही







