भद्रावती : चंद्रपूरला शिक्षणासाठी भद्रावती तसेच गावावरून असंख्य विध्यार्थी येजा करतात. परंतु चंद्रपूर येथुन भद्रावती ला येणाऱ्या विद्यार्थ्यांना चंद्रपूर – नागपूर बस तसेच अन्य लांब पल्ल्याच्या बसमध्ये बसण्यास वाहकांकडुन मज्जाव करण्यात येत होता. यासंबंधीची तक्रार ग्राहक पंचायत भद्रावती कडे येताच ग्राहक पंचायत भद्रावती च्या चमुने त्वरित चंद्रपूर आगार व्यवस्थापक यांची भेट घेवुन त्यांना पत्र दिले. आगार व्यवस्थापक यांना भेटुन विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना कोणत्याही बसमधुन प्रवास करण्यास थांबवु नये असे सांगण्यात आले.

यावेळी ग्राहक पंचायत भद्रावती चे पदाधिकारी वसंत वऱ्हाटे, वामन नामपल्लीवार, जीतेंद्र चोरडिया, आण्याजी ढवस, प्रभात कुमार तन्नीरवार तसेच ग्राहक पंचायत गोंडपिपरीचेसंतोष आस्वले, शंकर पाल,पत्रु बक्षे आदी उपस्थित होते
आजच त्वरित पत्रक काढुन सर्व बस वाहकांना आणि चंद्रपूर आगार कार्यालयास सुचना दिल्या जाईल आणि यानंतर विध्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. प्रीतेश रामटेके, आगार प्रमुख, चंद्रपूर






