भद्रावती :
डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालय, भद्रावती च्या वतीने व डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प, ऑर्डनन्स फॅक्टरी, चांदा यांच्या संयुक्त विद्यमाने NCC कॅडेट्ससाठी विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या व्याख्यानामध्ये इयत्ता 11 वी चे NCC कॅडेट्स व कला शाखेतील (Bachelor of Arts) विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात डिफेन्स सिक्युरिटी कॉर्पचे सुभेदार जसवीर सिंग यांनी NCC कॅडेट्सना संरक्षण क्षेत्रातील करिअरच्या संधी (Career Opportunities in Defence) याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
हा संपूर्ण कार्यक्रम भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशानुसार पार पडला. डॉ.विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालय प्राचार्य प्रमोद पाठक या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे एसोसिएट एनसीसी ऑफिसर डॉ. प्रशांत पाठक व वरिष्ठ महाविद्यालयाचे एसोसिएट एनसीसी ऑफिसर प्रवीण पाठक प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये प्रा. विशाल दीपक प्रसाद, प्रा. नेहा मानकर, प्रा. कपिल राऊत, प्रा. दीपमाला लोखंडे, सीमा हवेलिकर, पुनम काळे आणि नेहा सुर्तीकर यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेत संरक्षण क्षेत्रात जाण्याबाबत उत्सुकता दर्शविली.






