भद्रावती
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री या दोन महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली.
या जयंती समारंभाचे अध्यक्ष प्रा डॉ कार्तिक शिंदे सचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ सुधीर मोते व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनांनी झाली. या जयंती महोत्सवानिमित्त अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्रा डॉ कार्तिक शिंदे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री या महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. त्यांच्या पुरोगामी विचारांचा अंगिकार करण्याची समाजाला गरज असल्याचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा वानखेडे, ढोक, मोहरकर, नंदनवार यांनी समयोचित विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात तायक्वांदो क्रीडा स्पर्धेमध्ये नागपूर विभागातून अव्वल आलेला व राज्यस्तरावर ज्याची निवड झाली अशा यश टेकाम या खेळाडूचा सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाचे नाव अधोरेखित केल्याबद्दल त्याचे गुणगौरव करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण मते यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






