spot_img
spot_img
7.3 C
New York
Saturday, November 28, 2026

ग्रामपंचायत कर्मचारी यांना कामावर नं घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा..

जिल्हा लोहार संघटना अध्यक्ष
यांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांना निवेदन..

वरोरा तालुक्यातील पारडी येथील गटग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत दोन कर्मचारी श्रीकृष्ण तुरारे व राजेंद्र दाभेकर यांना सन २०२२ पासून ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणारे २५ टक्के वेतन व ५० टक्के भत्ता ग्रामसेवक यांनी दिला नसल्याचा आरोप पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी केला होता. तसेच ग्रामसेवक यांनी सदर रक्कम परस्पर लांबवल्याचीही आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही न्याय न मिळत असल्याने सदर कर्मचाऱ्यांनी १६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रातून पंचायत समितीसमोर १ जानेवारी 2026 ला कुटुंबासह उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्या वरून विस्तार अधिकारी यांनी चोकशी अहवाल लवकर देऊन असलेली रक्कम संबंधित ग्राम सेवकाकडून वसूल करून त्या कर्मचाऱ्याला देण्यात यावी असे सांगितले होते.
परंतु कित्येक दिवस लोटून सुद्धा संबंधित रक्कम न मिळाल्याने पाणीपुरवठा कर्मचारी दाभेकर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती याचा सूळ पारडी ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक, सरपंच व काही सदस्य यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर कामात हयगय केल्याचा खोटा आळ आणून पाणीपुरवठा कर्मचारी या पदावरून हकालपट्टी केली.


या कारवाईवरून राजेंद्र दाभेकर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे धाव घेतली असून आपल्यावर करण्यात आलेली कारवाई ही चुकीची असल्याची सांगितली असून या प्रकरणात लोहार समाजातर्फे संबंधित कर्मचाऱ्यांच्या वतीने या प्रकरणात आरोपी असलेले अधिकारी यांच्यावर येत्या आठ दिवसात कारवाई करून दाभेकर यांना परत सेवेत रुजू करावे अशी मागणी केली असून जर येत्या आठ दिवसात दाभेकर यांना सेवेत रुजू करून अन्याय करणाऱ्या त्या ग्रामसेवक वर योग्य ती कारवाई न केल्यास संपूर्ण जिल्ह्यातील लोहार समाजातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा चंद्रपूर लोहार समिती यांनी दिला असुन त्यावेळी चंद्रपूर जिल्हा लोहार समाज अध्यक्ष आनंद बावणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते..

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!