वाहन चालकांची नशे मध्ये प्रवासी वाहतूक..
7 मे ला सायंकाळी 7:30 च्या दरम्यान चंद्रपूर वरून चिमूर कडे जाणारी चिमूर एस. टी. महामंडळची प्रवासी बस क्र. एम.MH 40-Y-5177 ही शेगाव बू येथे बस स्टॉप जवळ डिव्हायडर वर चढल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती..
गाडी डिव्हायडर वर चढताच प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. सुमारे अर्धा तास एसटीची बस डिव्हायडर वर अडकून पडली होती. शेगाव पोलिसांच्या मदतीने डिव्हायडर वरून बस काढण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली, यावेळी प्रवाशांच्या सांगण्यावरून बस चालक हा चंद्रपूर निघाला तेव्हापासूनच अगदी बेजबाबदारपणे बस चालवत होता त्यामुळे शेगाव पोलीस यांनी संबंधित बस चालक याची मशीन द्वारे नशेची पडताळणी केली असता संबंधित एसटी चा ड्रायव्हर किशोर हा दारूच्या नशेत असलेला आढळला त्यामुळे त्यावर रात्री उशिरा पर्यंत मोटर वाहन कायदा 185 नुसार ड्रिंक अँड ड्राईव्हची केस दाखल करण्यात आली व याची माहिती वरिष्ठांकडे पाठवण्यात आली आहे.

एसटी महामंडळाचे वरोरा तसेच चिमूर आगाराचे काही कर्मचारी ड्रायव्हर दररोज शेगावला बस थांबल्यानंतर पाणी पिण्याच्या निमित्ताने शेगाव बस स्टॅन्ड जवळील एका अवैध रित्या दारू विक्री करणाऱ्या पान टपरीवर जाऊन ऑन ड्युटीवर असताना अशा प्रकारे दारूचे व्यसन करतात ज्यामुळे कित्येक वेळा प्रवाशांचा जीव धोक्यात येतो परंतु खाजगी वाहन धारकांचे ड्रिंक अँड ड्राईव्ह चेक करणारे परिवहन विभाग यांनी जणू एसटी महामंडळाच्या ड्रायव्हरला सुटच दिली आहे काय ? अशी अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरू असून त्यामुळे नियम काय फक्त खाजगी वाहनधारकांनाच आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खाजगी वाहन धारकाप्रमाणे एस टी महामंडळाच्या ड्रायव्हरची सुद्धा ड्रिंक अँड ड्राईव्ह टेस्ट नियमित केली जावी अशी मागणी या निमित्ताने प्रवासी करीत आहे..






