वरोरा : सन २०२१ मध्ये वरोरा तहसील अंतर्गत ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकित कर्तव्यावर असलेल्या काही कर्मचाऱ्याचे रखडलेले मानधन त्वरित देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक जिल्हा शाखा वरोरा च्या वतीने मा. मधुकर काळे नायब तहसीलदार वरोरा यांना देण्यात आले.

सन २०२१ च्या वरोरा तहसील अंतर्गत सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकित कार्यरत पथक क्रमांक १ ते २१० पर्यंत मानधन त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. परंतु त्यावेळी पथक क्रमांक २११ ते २६० यांना मानधन मिळाले नाही. त्यामुळे ते कर्मचारी कर्तव्य बजावून सुद्धा मानधनापासून वंचित असून त्याना त्वरित मानधन देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक वरोरा च्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी अमोल देठे जिल्हा कार्यवाह, राजेंद्र पांडे जिल्हा संपर्क प्रमुख, विकास घागी तालुका अध्यक्ष, सतीश डांगरे कार्यवाह, दिगांबर खुळसंगे कोषाध्यक्ष,संचित जांबुळे सहकार्यवाह, विलास खाडे उपस्थित होते.






