spot_img
spot_img
21.8 C
New York
Thursday, July 30, 2026

धक्कादायक…! सहा महिन्यापासून ग्राहकांना वीज बिल नाही

नियमित वीज बिल वितरित करा - ग्राहक पंचायत महाराष्ट्र

भद्रावती : ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा भद्रावती, जिल्हा चंद्रपूर च्या वतीने दि.०९ फेब्रुवारी ला महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी, भद्रावती यांना सोलर वीज मीटर ग्राहकांना नियमित वीज बिल वितरित करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले.

भद्रावती शहरातील गौतम नगरातील सोलर वीज मीटर ग्राहकांना ऑगस्ट २०२५ पासून वीज बिल वितरित करण्यात आले नाही. याविषयी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावतीकडे ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारींची दखल घेत ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावतीने उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन सर्व ग्राहकांना सप्टेंबर महिन्यापासूनचे वीज बिल लवकरात लवकर वितरित करावे आणि यानंतर कोणत्याही महिन्याच्या वीज बिलात खंड पडणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच कार्यात कसूर करणाऱ्या खाजगी कंपनीवर योग्य कारवाई करावी. असे स्पष्ट सांगण्यात आले.

यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा भद्रावती, जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष प्रवीण चिमूरकर, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार, कोषाध्यक्ष भारत खोब्रागडे, सहसचिव सौ. करूना मोघे, संघटक सोनल वावरे, सदस्य विनोद ठमके व प्रतिक्षा बनकर उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!