
काल कर्नाटक विधानसभेचे निकाल स्पष्ट झाले असून येथे काँग्रेसचा स्पष्ट बहुमताचे सरकार स्थापन केले. कर्नाटकात भाजपला मतदारांनी नाकारले असून देशपातळीवर या निकालाचे पडसाद पडत आहेत. कर्नाटक निकालाच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रीया देताना काँग्रेसचे अभिनंदन केलेच, शिवाय 2024 साली देशात होणाऱ्या निवडणुकांनंतर वेगळंच चित्र असेल असे देखील ते म्हणाले. तसेच दोन दिवसांत महाराष्ट्रात महाविकास आघाडीची बैठक बोलावली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
कर्नाटकात भाजपचा धुव्वा उडाला असून काँग्रेसने मोठा विजय मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये काँग्रेस १३६ जागांवर विजय मिळविला आहे. काँग्रेसने भाजपला चितपट केले असून या विजयाचे श्रेय काँग्रेसने कर्नाटकच्या जनतेला दिले. कर्नाटकात स्थानिक मुद्द्यांवर निवडणुक लढवत, भाजपच्या प्रचाराची हवा काढत विजयी वाटचाल केली. दरम्यान आगामी काळात राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगाना मध्ये निवडणुका होणार आहेत. तसेच लोकसभेची निवडणुक देखील 2024 मध्ये होऊ घातली आहे. भाजपला रोखण्यासाठी सध्या देशात महाआघाडीची चर्चा सुरु असली तरी अद्याप त्याला मुर्त रुप आलेले नाही. काँग्रेसच्या कर्नाटक विजयामुळे मात्र पक्षाला नवसंजीवनीच मिळालेली आहे. महाविकास आघाडीची बैठक घेऊन वज्रमूठ बांधणार आहेत. देशातील विरोधी पक्षांसोबत बैठक बोलावली जाणार आहे.






