spot_img
spot_img
22.3 C
New York
Thursday, July 30, 2026

लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला…

सावली

लेखक आपल्या भेटीला उपक्रमाअंतर्गत लोकसेवा मंडळ विहीरगाव द्वारा संचालित विकास विद्यालय तथा विकास कनिष्ठ महाविद्यालय विहीरगाव ता सावली जि चंद्रपूर येथे दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोज सोमवारला भाषा समृद्धीच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीकरिता महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला या उपक्रमांतर्गत विकास विद्यालय विहीरगाव तालुका सावली येथे सुप्रसिद्ध साहित्यिक विज्ञान कथा लेखक, वर्ग दहावीच्या निर्णय पाठाचे लेखक डॉ. सुनील विभुते सर प्रमुख वक्ते म्हणून मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाला अध्यक्षा प्राचार्या कु. गराटे मॅडम उपस्थित होते.

लेखक आपल्या भेटीला या उपक्रमातर्गंत दरवर्षी नवीन नवीन साहित्यिक लेखकांना विद्यालयात बोलावले जाते. या कार्यक्रमालत श्री विकास पुरेल्लीवर सर यांनी लेखकांचा परिचय दिला. डॉ गावंडे सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. या कार्यक्रमाप्रसंगी वर्ग दहावीच्या निर्णया पाठाचे लेखक डॉ सुनील विभुते सर यांनी या पाठाची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली तसेच विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते डॉ सुनील विभुते सर यांनी विविध शास्त्रज्ञांच्या छोट्या-मोठ्या शोधांच्या कथा सांगितल्या.

या प्रसंगी कु. अक्षरा अलाम, कृतिका गेडाम वर्ग दहावा या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. श्री मोटघरे सर, श्री चावरे सर कु. बोबाटे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वक्त्यांनी विद्यार्थी मनोगत ऐकले . वर्ग दहावीच्या निर्णय या पाठासंदर्भातील अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. त्याची वास्तविक उत्तरासह विविध उदाहरणं सरांनी दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या कु. गराटे मॅडम यांनी लेखक प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमोर आहेत, ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या संदर्भात सुंदर असं मार्गदर्शन केलं.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अनुष्का कोलते आणि तन्मय बारेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मीनल घोडमारे हिने केले. उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, पालक आणि विद्यार्थी यांनी भरभरून प्रतिसाद दिला.सदर कार्यक्रमाला सर्व शिक्षक , शिक्षिका , प्राध्यापक , प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी,पालक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!