चिमूर
शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व पंचायत समिती चिमूर यांचे संयुक्त विद्यमाने, मधुवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जांभुळघाट ता. चिमूर येथे दिनांक 27 ते 29 नोव्हेंबर 2025 ला आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्य गटातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कपर्ला ता. चिमूर येथील गणित/विज्ञान विषय शिक्षिका कु. मुसरतजहाॅं अलीमोहम्मद खान (सौ. मुसरतजहाॅं परवेज शेख) यांचा प्रथम क्रमांक आला.
या विज्ञान प्रदर्शनीत त्यांनी विकसित व आत्मनिर्भर भारतासाठी STEM या मुख्य विषयअंतर्गत गणितीय विषयासाठी ‘कबाड से जुगाड’ हे शैक्षणिक साहित्य निर्माण करून सादरीकरण केले. त्यांना प्रमुख अतिथी तथा बक्षीस वितरक मा. श्री. राम राऊत सर माझी प्राचार्य जनता कनिष्ठ महाविद्यालय नेरी, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉ. पितांबर पिसे प्रभारी प्राचार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चिमूर, प्रमुख पाहुणे श्री निशिकांत मेहरकुरे सर प्राचार्य नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिमूर, मा. श्री प्रकाश पालांदुरकर सर मुख्याध्यापक राजीव गांधी विद्यालय मासाळ, प्रा. डॉ. कात्रजवार सर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविद्यालय चिमूर, मा. चाफले सर सेवानिवृत्त शिक्षक जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नेरी, मा. श्री व्ही. जी. वांदिले सर प्राचार्य मधुवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जांभुळघाट व आयोजक श्री विशाल बोधाने सर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चिमूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले व जिल्हास्तरासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.






