spot_img
spot_img
32 C
New York
Saturday, June 6, 2026

संविधान दिनानिमित्त संविधान रॅलीचे आयोजन …

यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन संपन्न..

भद्रावती

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा आयोजित यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे संविधान दिनानिमित्त संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले, तसेच संविधान दिन मोठ्या थाटात संपन्न झाला.

यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे २६ नोव्हेंबर संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान रॅली तसेच मतदान जागृती अभियाना द्वारे मतदार जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही संविधान रॅली संताजी नगर ,मेन रोड मार्गे काढण्यात आली . संविधान दिनानिमित्त संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रम सुध्दा घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.

संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना व्हावे यासाठी संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री डॉ सुधीर मोते सर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ ज्ञानेश हटवार, किशोर ढोक हे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी मार्गदर्शन करताना संविधानाचे महत्व पटवून दिले. समानता, स्वातंत्र्य व बंधुता हे मुल्य आपणास संविधानाने दिले. स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. त्याचा योग्य वापर आपण केला पाहिजे असे प्रतिपादन केले. भारतीय लोकशाही व्यवस्था ही संविधानाच्या मार्गदर्शक मूल्यांवर चालत आहे. भारतीय लोकशाही ही सर्वात मोठी जगातील लोकशाही व्यवस्था आहे, असे मार्गदर्शन डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले. प्रा. किशोर ढोक सर यांनी संविधानाचे आपल्या जीवनातील महत्व व विविध कलमाने द्वारे मिळालेल्या अधिकारावर प्रकाश टाकला. संविधान दिनानिमित्त संविधान उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रेमा पोटदुखे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणिता बोकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. माही ढोके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा रमेश चव्हाण, चंद्रशेखर जुमळे, भिष्माचार्य बोरकुटे, हरिहर मोहरकर तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!