पुणे
श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा महाविद्यालयातील उदय शिंदे आणि जयश्री कोकणे या दोन खेळाडूंची दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी श्रमिक ज्युनिअर कॉलेज संगमनेर येथे पार पडलेल्या विभागीय हॅण्डबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरीच्या जोरावर माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालय सेक्टर ९ कामोठे, पनवेल येथे पार पडलेल्या २८, २९, ३०, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेकरिता निवड झाली होती. सदर राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेमधून राष्ट्रीय स्पर्धेचा संघ निवडला जातो. या संघात एकूण २० खेळाडूंची निवड केली जाते त्यापैकी १६ खेळाडू हे संघात खेळतात व चार खेळाडू राखीव असतात.
या स्पर्धेत श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथील उदय शिंदे व कु. जयश्री विठ्ठल कोकणे या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्याच्या हँडबॉल संघात निवड झाली . महाराष्ट्र संघात खेळाडू म्हणून निवड झाल्याबद्दल जिमखाना विभागाचे व विद्यार्थ्यांचे जुन्नर तालुका शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे यांनी विद्यार्थ्यांचे व जिमखाना विभाग प्रमुख प्रा मयुर बोंबले संराचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही. बी. कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे, उपप्राचार्य डॉ. आर. डी. चौधरी, ज्युनिअर महाविद्यालयाच्या समन्वयक व उपप्राचार्या प्रा. पी. एस. लोढा पर्यवेक्षक प्रा. एस. ए. श्रीमंते एमसीव्हीसी विभाग प्रमुख प्रा. के. जी. नेटके, वरिष्ठ जिमखाना विभाग प्रमुख डॉ. ए. के बडे सर्वांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य संघात खेळाडूंची निवड झाल्याने खेळाडूंची सर्वत्र कौतुक होतं आहे.






