spot_img
spot_img
22.6 C
New York
Saturday, August 1, 2026

सौ. केशनी हटवार महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्काराने सन्मानित..

पुणे येथील कार्यक्रमात आयुक्तांच्या हस्ते सत्कार….

भद्रावती.

साने गुरुजी सोसायटी भद्रावती येथील रहिवासी सौ. केशनी ज्ञानेश हटवार यांना स्त्री कर्तृत्वासाठी दिला जाणारा “महाराष्ट्र नारीशक्ती समाज रत्न” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गौरव कर्तुत्वाचा राज्यस्तरीय “महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न” पुरस्कार वितरण सोहळा हा १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ, पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

भद्रावती येथील सौ केशनी ज्ञानेश हटवार यांच्या सामाजिक, साहित्यिक व आकाशवाणी वरून प्रसारित झालेला कार्यक्रमाची दखल घेऊन, ए. डी. फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा “महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला अध्यक्ष डॉ नितीन वाघमोडे आयकर आयुक्त पुणे, प्रा डॉ अंजना खताळ मॅडम विधीज्ञ मुंबई, डॉ सारीका शहा मिसेस इंडिया 2018 मिस वर्ल्ड 2021, एडव्होकेट प्रियदर्शनी कोकरे , प्रा. शिवाजी खांडेकर सरचिटणीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य , अशोक गोरड संस्थापक अध्यक्ष ए डी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

त्यांचे आकाशवाणी वरती भरपूर कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. विज्ञान जगत, स्त्री सक्षमीकरण, स्त्री आरोग्य, स्त्री संघटना, पर्यावरण विषयक जाणीव जागृती, साहित्यिक कार्यक्रम, हॅलो सखी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन कार्यक्रम आकाशवाणी वरून प्रसारित झाले. त्या सोबतच सामाजिक , साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. अनेक कवी संमेलनात त्या सहभागी होतात.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ए.डी. फाउंडेशन च्या वतीने दिला जाणारा “महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार” मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने कार्य करण्याची नवी उर्मी मिळते, या विचार सूत्रावर आयोजित केलेल्या ए. डी. फाउंडेशनच्या “महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार” सोहळ्यात फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अशोक गोरड यांनी प्रस्तावनेत सांगितले. सौ. केशनी ज्ञानेश हटवार यांना “महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार” मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनाली कोकरे यांनी केले. कार्यक्रमाला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त महिला परिवारासह उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!