spot_img
spot_img
23.8 C
New York
Saturday, August 1, 2026

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

चंद्रपूर,दि. 14 : शहरामधील दीक्षाभूमी मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे 15 आणि 16 ऑक्टो रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून सदर सोहळयात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. या दरम्यान वाहतुक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणून दीक्षाभुमी मैदानकडे जाणाऱ्या रहदारीच्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक बंद ठेवणे आवश्यक आहे.त्या अनुषंगाने 15 ऑक्टो. च्या सकाळी 8 वाजतापासून 17 ऑक्टो. च्या 8 वाजेपर्यंत शहरातील वाहतुक व्यवस्थेत पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहे.

सर्व प्रकारच्या वाहनाकरीता खालील मार्ग बंद : दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या बौध्द बांधवाची गर्दी पाहता पाण्याची टाकी चौक – जुना वरोरा नाका ते कलेक्टर बंगला रोड/हुतात्मा स्मारक जवळील रोड, तसेच वरोरा नाका चौक -मित्रनगर चौक ते सिंधी पंचायत भवन व मित्रनगर चौक ते जिल्हा स्टेडीयमपर्यंत या सर्व परीसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहील. तसेच सदरचा सर्व परीसर नो पार्कीग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे.

अवजड वाहनाकरीता पर्यायी रहदारीचा मार्ग : 1) सदर कालावधी दरम्यान गरजेनुसार नागपूरकडून चंद्रपुरकडे येणारी सर्व प्रकारची जड़ वाहने ही हॉटेल कुंदन प्लाझा येथून सीटीपीएस मार्गे नेहरू नगरवरून मुल रोडला जातील. 2) मुलकडून नागपुरकडे जाणारी जड वाहने ही बंगाली कॅम्प, सावरकर चौक, वरोरा नाका उडाणपुल या मार्गाने जातील. किंवा नेहरू नगर वरून सिटीपीएस मार्गे नागपुर कड़े जातील. तसेच गरजेनुसार एम.ई. एल.नाका चौक येथे सदर वाहने थांबवण्यात येतील. 3) बल्लारशा कडून नागपूरकडे जाणारी जड वाहने बंगाली कॅम्प, नेहरू नगर वरून सिटीपीएस मार्गे नागपूरकडे जातील किंवा पलीकडे बंगाली कॅम्प डि.आर.सी. बंकर, बायपास रोड येथे दीक्षाभूमी मार्गावरील अनुयायांची गर्दी पाहुन थांबवण्यात येईल.

शहरातील दुचाकी व चारचाकी हलकी वाहनाकरिता रहदारी व्यवस्था : जुना वरोरा नाका चौक ते आंबेडकर महाविद्यालय-मित्र नगर चौक-टि. बी . हॉस्पीटल पर्यंतचा मार्ग सर्व प्रकारचे वाहनाकरिता (सायकल सहीत) बंद करण्यात येत आहे. पाण्याची टाकी, विश्रामगृह, जुना वरोरा नाका हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहना करिता (सायकल सहीत) दोन्ही बाजुने बंद करण्यात येत आहे. करिता नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने (जड वाहने वगळून) वरोरा नाका उड्डाण पुल सिध्दार्थ हॉटेल, बस स्टैंड, प्रियदर्शनी चौक मार्गे शहराकडे जातील.रामनगर, मित्र नगर, आकाशवाणी, स्नेहनगर, वडगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याची टाकी –दवा बाजार – संत केवलराम चौक- दाताळा रोड मार्गे पर्यायी रस्त्याने आपली वाहने, जड वाहने वगळून घेवून जातील. त्याचप्रमाणे जटपुरा गेट कडून रामनगर मार्गे जुना वरोरा नाकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी आपली वाहने पाण्याची टाकी, प्रियदर्शनी चौक, बस स्टैंड, सिध्दार्थ हॉटेल, उड्डान पुल मार्गं नागपूरकडे जातील.

दीक्षाभूमी सोहळयास येणाऱ्या नागरिकांकरिता वाहन पार्कींग स्थळ: 1) नागपूर रोडने दीक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनाकरीता शकुंतला लॉन, जनता कॉलेज समोरील पटांगण (ईदगाह मैदान) 2) शहरातून दीक्षाभूमी कडे येणारे वाहनाकरीता सेंट मायकल स्कुल मैदान, सिंधी पंचायत भवन जवळील मैदान. 3) वडगांव, आकाशवाणी व लगतच्या परिसरातुन दीक्षाभूमीकडे येणारी वाहनाकरिता लोकमान्य टिळक हायस्कुल (जिल्हा स्टेडीयम जवळ), जीवन साफल्य गृह निर्माण सहकारी संस्था (मनोमय हॉस्पीटलच्या मागे), 4) मुल रोड, बंगाली कॅम्प, तुकुम या परिसरातुन येणाऱ्या अनुयायांनी आपली वाहने कृषी भवन जवळील ट्रॅव्हल्स स्टँड या ठिकाणी (मोटार सायकल) पार्क करावी व चारचाकी वाहने वरील दिलेल्या इतर पार्किंग स्थळी पार्क करावी.

सदर अधिसूचना 15 ऑक्टो च्या सकाळी 8 वा पासून 17 ऑक्टो च्या सकाळी 8 वाजतापर्यंत अंमलात राहील. तसेच सदर अधिसूचनेच्या अमंलबजावणीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल. तरी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळ्यामध्ये सहभागी सर्व बौध्द बांधव / अनुयायी व जनतेने वरील वाहतुक व्यवस्थेचा वापर करून घोषित पार्कींग व्यवस्थेमध्येच आपली वाहने ठेवावी तसेच वाहतुक व्यवस्थेचे (नियमाचे) पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!